इवलेसे रोप लावियले द्वारी……. सन १९७५, Spring चे दिवस, इन मीन १२ families आणि त्यांनी ईशान्य ओहायो मराठी मंडळाची पायाभरणी केली. पुढे हा वृक्ष फोफावत गेला आणि २०२५ चे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष उजाडले! आपलं ईशान्य ओहायो मराठी मंडळ एक सांस्कृतिक संस्था म्हणून गेली सलग ५० वर्षे कार्यरत आहे. म्हणजे गेली ५० वर्षे मंडळाचे ५० अध्यक्ष आणि त्या त्या वर्षीच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी आणि स्वयंसेवकांनी जणुकाही आपल्या घरचंच काम आहे अशा भावनेने मंडळाचे काम केले आहे. याच बरोबर मंडळाचे सर्व सदस्य या काम करणाऱ्यांना नेहेमी प्रोत्साहन देत आले आहेत. आणि हे सगळं ते त्यांच्या मंडळावरील प्रेमापोटी करीत आहेत. मंडळाचा सुवर्ण महोत्सव सोहळा आणि BMM मेळावा ह्यांचा योग येणं म्हणजे आपल्या मंडळा साठी अभिमानाची गोष्ट आहे. BMM मेळावा करण्या मागे BMM ची अशी सुप्त इच्छा आहे की दर दोन वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रीय BMM सोहळ्याला जोडून इतर ठिकाणी ही कार्यक्रम होत रहावेत अशी प्रेरणा अमेरिकेतील इतर मंडळं घेतील. आणि ती संधी आपल्या मंडळाला मिळाली आहे. हा सोहळा आनंदाने उत्साहाने आणि सर्वांच्या सहकार्याने पार पाडायचा आहे. त्यात आपले धनदान, श्रमदान आणि समयदान हे अपेक्षित आहे. कारण हा सर्वांच्या घरचा सोहळा आहे. तर आता कामाला लागू या….
Because we are celebrating 50 years of this beautiful journey with the rest of the Marathi mandals.
Opportunity to meet Marathi people across the USA working in different work domains, businesses, and organizations.
Insightful and inspirational speech from the famous celebrities and speakers.
Meet and greet with people from the Maharashtrian community in the USA. Let's make new friends.
Cultural programs include musicals, dramas, dance performances, and live orchestra.
TBD
Cleveland, Ohio, USA
+977 722 225591
bmmcle2025@neomm.org